रुद्रनाद,
२०१३ साली चार मित्रांनी ठरवले कि आपल्या अ.नगर शहरामधील गणेश उत्सव सांस्कृतिक पद्धतीने व्हावा आणि मग काय,
सुरु झाली तयारी नगर मधील एका नवीन सांस्कृतिक चळवळीची. त्या चार मित्रांनी हि अनोखी कल्पना त्यांच्या अजून
मित्रांना सांगितली आणि ते मित्र पण या चळवळी मध्ये येण्यास आणि नगरचा गणेशोत्सव सांस्कृतिक करण्यास तयार झाले.
आणि विचार करत असतांना अचानक नाव सुचले ते म्हणजे "रुद्रनाद"
रुद्रनाद गेली १२ वर्ष झालीत नगर मध्ये सातत्याने ढोल वादन व सामाजिक कार्य करत आहे. मग ते वादन करून असो किंवा
अनाथ आश्रमाला दान असो किंवा पूरग्रस्त परिसरात फूड पाकीट पाठवणे असो. या आणि अश्या अनेक पद्धतीने रुद्रनाद
वादना बरोबरच सामाजिक कार्यात आपला हातभार लावत आले आहे.
रुद्रनाद म्हणजेच अ.नगर मधील सर्वात जुने वाद्य पथक आहे. या पथकाने नगर मधेच अनेक पथकांना सराव देवून नवीन
पथकांची निर्मिती हि केली आहे.
आत्ता पर्यंत म्हणजे गेली १२ वर्षात रुद्रनाद मध्ये १००० (एक हजार ) पेक्षा जास्त तरुण मुलं मुलींनीही वादन करून
या सांस्कृतिक चळवळी मध्ये आपले मोलाचे योगदान दिले आहे.
रुद्रनाद ने अ.नगर महाराष्ट्रामध्ये नाही तर आत्ता पर्यंत बाहेर राज्यात जसे हैद्राबाद, तेलंगण मध्ये पण जाऊन
वादन करून अ.नगर व महाराष्ट्राचे नाव उंचावण्याचे प्रयत्न केली आहे.. याच प्रमाणे मायबाप रसिकांचे आशीर्वाद
पाठिशी असतील तर रुद्रनाद ची प्रगती हि अशीच होत राहील यात शंका नाही... आणि होणाऱ्या प्रगती मध्ये तुम्ही पण
सहभागी व्हावं अशी आम्ही विनंती करतो...
एक साथ एक आवाज रुद्रनाद
आता कुठूनही व्हा
अ.नगरच्या
मानाच्या पथकाचे सभासद...